मेरी कॉम या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या प्रियंका चोप्राला तिची चुलत बहीण परिणिती चोप्रासोबत काम करण्याची इच्छा आहे. नुकतेच एका मुलाखतीत जेव्हा तिला परिणितीसोबत काम करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, ‘आतार्पयत आम्ही दोघींनी एखादा चित्रपट सोबत करायला हवा होता; पण आमच्याकडे आजवर ज्या ऑफर्स आल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. मला परीसोबत स्क्रिनशेअर करण्याची इच्छा आहे; पण चित्रपटाची स्क्रिप्ट दमदार हवी. ती खूप चांगली अभिनेत्री आहे आणि तिच्यासोबत काम करताना मजा येईल.’ परिणितीच्या गायक बनण्याच्या इच्छेबाबत जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा प्रियंका म्हणाली की, ‘आमच्या घरात सर्वच गायक आहेत, माङया मते कोणीही गायक बनू शकतात. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्ही काहीही काम करू शकता.