Join us

‘बेवॉच’चे प्रमोशन अन् प्रियांकाची धम्माल मस्ती!

By admin | Updated: April 1, 2017 04:49 IST

प्रियांका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट पाहण्यास आपण सगळेच उत्सुक आहोत. ‘बेवॉच’ या सिनेमाद्वारे प्रियांका हॉलिवूड

प्रियांका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट पाहण्यास आपण सगळेच उत्सुक आहोत. ‘बेवॉच’ या सिनेमाद्वारे प्रियांका हॉलिवूड डेब्यू करणार आहे. यात तिच्यासोबत दिसणार आहेत ते ड्वेन जॉन्सन, झॅक अ‍ॅफ्रॉन, अ‍ॅक्झान्ड्रा डॅडॅरिओ, केली रोहरबॅच आणि जॉन बॉस. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आपण नुकताच बघितला. आता या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट आणि त्यातल्या प्रियांकाच्या अदा याकडे आपले लक्ष लागले आहे. ‘बेवॉच’चे प्रमोशन सुरू झाले आहे आणि प्रियांका यात हिरिरीने सहभागी होताना दिसतेय. प्रमोशनच्या निमित्ताने ‘बेवॉच’ची संपूर्ण स्टारकास्ट सिनेमाकोन येथे गेली होती. येथे या स्टारकास्टने आपल्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी प्रियांका जाम मस्ती करताना दिसली. केवळ एवढेच नाही तर या तिघींनी ब्रिटनी स्पियर्सचे गाणे गात, त्यावर ठेकाही धरला. या इव्हेंटमध्ये प्रियांकाचे हॉट अँड ग्लॅमरस लुक सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. या वेळी प्रियांका ब्लॅक स्कर्टसोबत वॅपराऊंड टॉपमध्ये दिसली.