Join us

नर्गिसच्या नजरेत प्रियंका हॉट आयटम गर्ल

By admin | Updated: July 11, 2014 00:25 IST

अभिनेत्री नर्गिस फाखरी सलमान खानच्या किक या चित्रपटात एक आयटम साँग करताना दिसणार आहे.

अभिनेत्री नर्गिस फाखरी सलमान खानच्या किक या चित्रपटात एक आयटम साँग करताना दिसणार आहे. आजवर एक-दोन आयटम साँग करणा:या नर्गिस फाखरीच्या मते, प्रियंका चोप्रा बॉलीवूडची हॉटेस्ट आयटम गर्ल आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नर्गिसला विचारण्यात आले की, बी-टाऊनची सर्वात चांगली आयटम डांसर कोण आहे? यावर तिने उत्तर दिले की, ‘दीपिका, करिना, कॅटरिना सर्वच खूप चांगल्या आहेत; पण जर एखादीची निवड करायचीच असेल, तर मी प्रियंकाची निवड करीन. तिचे डांस नंबर्स प्रेक्षकांना आकर्षित करतात.’