Join us

प्रियंका-करिनादिसतील एकत्र

By admin | Updated: August 29, 2014 01:48 IST

काही वर्षांपूवी ‘ऐतराज’ या चित्रपटात करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा एकत्र दिसल्या होत्या. करिना त्यावेळी टॉपची अ‍ॅक्ट्रेस होती

काही वर्षांपूवी ‘ऐतराज’ या चित्रपटात करिना कपूर आणि प्रियंका चोप्रा एकत्र दिसल्या होत्या. करिना त्यावेळी टॉपची अ‍ॅक्ट्रेस होती, तर प्रियंकाने नुकतेच चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. शूटिंगदरम्यान दोघींचे संबंध एवढे तणावाचे झाले की, पुढे त्यांनी कधीच एकत्र काम केले नाही. आता मात्र या दोघी युनिसेफच्या एका डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये सोबत दिसणार असल्याची बातमी आहे. जे काम बॉलीवूडला करता आले नाही, ते युनिसेफने केले असे म्हणावे लागेल. युनिसेफची ही डॉक्युमेंट्री केल्यानंतर या दोघींमधील तणाव संपेल, अशी अपेक्षा आहे. प्रियंका युनिसेफच्या बालक अधिकार कार्यक्रमाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, तर करिना देशातील मुलांच्या शिक्षणासाठी युनिसेफच्या कार्यक्रमांसाठी काम करते. या डॉक्युमेंट्रीसाठी प्रियंकाने करिनाला अ‍ॅप्रोच केल्याचे सूत्रांकडून समजते. या बातमीला दुजोरा देत आपणही या डॉक्युमेंट्रीत काम करणार असल्याचे करिनाने म्हटले आहे.