Join us

प्रियांकाला मिळाली दोन हॉलिवूडपटांची आॅफर!

By admin | Updated: June 7, 2017 02:47 IST

‘बेवॉच’ या आपल्या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रीमिअरला वेगवेगळ्या देशांत जाऊन हजेरी लावल्यानंतर प्रियांका चोप्राचा हा चित्रपट आज भारतात रिलीज झाला

‘बेवॉच’ या आपल्या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रीमिअरला वेगवेगळ्या देशांत जाऊन हजेरी लावल्यानंतर प्रियांका चोप्राचा हा चित्रपट आज भारतात रिलीज झाला. ‘बेवॉच’ रिलीज होण्याआधीच प्रियांकाजवळ आणखी दोन हॉलिवूडपटाच्या आॅफर तयार असल्याचे कळतेय. ‘अ किड लाइक जॅक’ आणि ‘इझंट इट रोमँटिक’ या दोन सिनेमांमध्ये प्रियांका दिसणार असल्याची चर्चा सध्या आहे. प्रियांका जूनमध्ये ‘अ किड लाइक जॅक’ या सिनेमाचे शूटिंग सुरू करणार आहे. यानंतर ‘क्वांटिको’चे सीझन ३ ती पूर्ण करणार आहे. याचसोबतीलाच ‘इझंट इट रोमँटिक’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला ती सुरुवात करणार आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेने खरे तर प्रियांकाला मोठी ओळख मिळवून दिली. या मालिकेचे दोन्ही सीझन कमालीचे लोकप्रिय झालेत. या मालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवली.