Join us

प्रियंका बनली शाळेच्या प्रोजेक्टचा विषय!

By admin | Updated: November 8, 2016 12:28 IST

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या देसी गर्ल प्रियंका चोप्राने क्वांटिको मालिकेमधून हॉलिवूडमध्येही जम बसवलाय. आता तर प्रियंका चक्क प्रोजेक्टचा विषय बनली आहे.

ऑनलाइन लोकमत
 न्यूयॉर्क, दि. 8 - बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या देसी गर्ल प्रियंका चोप्राने क्वांटिको मालिकेमधून हॉलिवूडमध्येही जम बसवलाय. आता तर  प्रियंका चक्क प्रोजेक्टचा विषय बनली आहे. ऑर्चर्ड लेक मिडल स्कूलमध्ये शिकणाऱ्या  प्रिया शाह या 12 वर्षीय विद्यार्थीनीने  प्रियंकाच्या दिनचर्येवर प्रोजेक्ट तयार करून भाषण दिले. 
प्रियंकाने प्रियाचे भाषण  ट्विट केले आहे. तसेच एका अभिनेत्रीला प्रोजेक्टचा विषय म्हणून निवडल्याने तिचे आभारही मानले आहेत. प्रोजेक्टमधील भाषणात प्रियाने प्रियंकाच्या 2000 साली मिस वर्ल्ड बनल्यापासून ते सध्याच्या क्वॉटिको कार्यक्रमापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. तसेच या  भाषणात प्रियाने प्रियंकाच्या मेरी कॉम, गुंडे आणि फॅशन अशा चित्रपटातील संवादांचाही समावेश केला होता.  

प्रियंका सध्या अमेरिकेतील क्वॉटिको या मालिकेत अॅलेक्स पेरिस या सीआयए एजंटची भूमिका भूमिका करत आहे. तसेच तिची निर्मिती असलेला व्हेंटिलेटर हा मराठी चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे.