Join us

प्रियांका-अक्षयचे पॅचअप साँग

By admin | Updated: November 7, 2016 01:56 IST

रोमँटिक, सॅड, ब्रेकअप, रॅप, डिस्को अशी कितीतरी प्रकारची गाणी आपण ऐकतो. पण, तुम्ही कधी पॅच-अप साँग ऐकले आहे का? ब्रेक अप आणि पॅच अप या गोष्टी आज नकळतपणे प्रत्येक नात्यात घडतच असतात

रोमँटिक, सॅड, ब्रेकअप, रॅप, डिस्को अशी कितीतरी प्रकारची गाणी आपण ऐकतो. पण, तुम्ही कधी पॅच-अप साँग ऐकले आहे का? ब्रेक अप आणि पॅच अप या गोष्टी आज नकळतपणे प्रत्येक नात्यात घडतच असतात. ब्रेकअपवर अनेक गाणी हिंदी-मराठीमध्ये चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटातही जर ब्रेकअप झाले, तर लगेचच एखादे सॅड साँग आपल्याला पाहायला मिळते. पण, पॅचअपवर आजपर्यंत कधी गाणे आले नाही. आता प्रियांका बर्वे ही सध्याची मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची गायिका पॅचअप साँग घेऊन आली आहे. ‘येना आज आत्ता पॅचअप होऊ देना... नको ना सारखं सारखं ब्रेकअप नको ना.’ असे शब्द असलेले हे गाणे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या गाण्याविषयी प्रियांका सांगते, मला जवळपास दीड वर्षांपूर्वी सत्यजित केळकर यांनी या गाण्याची चाल ऐकवली होती. मला ती चाल फारच आवडली होती. मग मी माझ्या आईला या चालीवर काही शब्द लिहायला सांगितले होते. आईला ब्रेकअप आणि पॅचअपची कल्पना सुचली. सध्या आपण पाहिले तर नात्यांमध्ये कधी दुरावा येतो, कधी सगळं काही विसरून आपण पुन्हा एकत्र येतो. याच संकल्पनेवर आधारित हे पॅचअप साँग तयार झाले. मी गाणे सागरिकाला ऐकवले. तिला ते आवडल्याने त्यावर अल्बम करायचे ठरले. यामध्ये माझ्यासोबत अक्षय वाघमारे हा अभिनेता आहे. जसराज जोशीने देखील हे गाणे माझ्यासोबत गायले आहे. ‘कास लेक’च्या निसर्गमय ठिकाणी आम्ही या गाण्याची शूटिंग केली आहे. या गाण्याची कोरिओग्राफी मेघा संपत यांनी केली आहे. हे गाणे एकदम हटके असल्याने ते प्रेक्षकांना आवडत आहे.