बेनझीर जमादारमुंबई- प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या खूप चर्चेत आहे. तिने वाढविलेल्या वजनामुळे ती सध्या सोशल मीडियावर देखील हिट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जण तिच्या वजनदार चित्रपटातील या मेहनतीचे कौतुक करताना दिसते आहे. पण, वजनदार बनलेल्या प्रियाचा अनुभव कसा होता. याविषयी लोकमत सीएनएक्सने प्रियाशी साधलेला खास संवाद.तुझ्या वजनदार भूमिकेविषयी काय सांगशील?- वजनदार या चित्रपटासाठी मी ६७ किलो वजन दीड महिन्यांत वाढविले आहे. या वाढलेल्या वजनाला घेऊन सुरुवातीला माझी चीडचीड व्हायची. मला स्वत:ला मीच आवडत नव्हते. पण या चित्रपटातील पूजा या भूमिकेची ती गरज होती. म्हणून एक अभिनेत्री म्हणून मी हे चॅलेंज घेऊन वजन वाढविले आहे. त्यानंतर अशी जाणीवदेखील झाली, की आपण जसे आहोत तसेच छान आहोत. स्त्री या मुले, पती या सगळयांच्या मागे धावताना स्वत:कडे लक्ष द्यायचे विसरून जातात. या गोष्टींचा सर्वाधिक अनुभव मी यादरम्यान घेतला आहे. त्यामुळे स्त्रियांनी सर्वांत आधी स्वत:कडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. असं म्हणतात, की टॉपच्या दोन अभिनेत्री कधी चांगल्या मैत्री बनू शकत नाही, याबद्दल तुझे म्हणणे काय आहे? - खरेतर आम्ही दोघींच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला एकत्र सुरुवात झाली आहे. पण, कामाच्या बाबतीत माझ्यापेक्षा सईला जास्त अनुभव आहे. २०१३ मध्ये आलेल्या टाइमप्लीज या चित्रपटात आमच्या दोघींचा एकत्र एक सीन होता. तेव्हापासून मी आणि सई एकमेकींना ओळखतो. मात्र, ३ वर्षांपूर्वीचे आमच्यातले नाते आणि आता वजनदार चित्रपटादरम्यान तयार झालेले आमच्यातले नाते, यात खूप फरक आहे. सईने आणि मी एकमेकींना समजून घेण्यासाठी थोडी स्पेस दिली आहे. त्यामुळे आमचा हा एकत्रित प्रवास खऱ्या अर्थाने आता खूप वजनदार झाला आहे. आता, आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे. या चित्रपटात अभिनय आणि गाणे अशी दुहेरी जबाबदारी तू संभाळताना दिसते आहेस, याबद्दल काय सांगशील?- मी याविषयी मला आलेला अनुभव सांगते. कारण गोलू पोलू या गाण्यामध्ये अधिक संवाद आहे. मी एक अभिनेत्री असल्यामुळे हा संवाद साधताना मला चेहऱ्यावर हावभाव येऊ द्यायचे नव्हते. मात्र, त्याच वेळी अभिनेत्री असल्यामुळे गाण्यामध्ये संवाद साधणे हे माझ्यासाठी तितकसं कठीणदेखील नव्हते. म्हणूनच एक अभिनेत्री आणि गायिका या दोन्ही भूमिका एकाच चित्रपटात निभावणे मला सोयीस्कर पडले आहे. झीरो फिगरच्या मानसिकतेविषयी तुझे काय मत आहे?- मी एवढेच म्हणेण, की झीरो फिगर बनविण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नये. तसेच जाड किवा बारीक होणे महत्त्वाचे नाही, तर तुमची हेल्थ सर्वांत जास्त व्यवस्थित असणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. तर, दुसरीकडे लग्नानंतर स्त्रियांच्या मनात आपल्या तब्येतीविषयी न्यूनगंड असतो. कधीकधी पतीकडूनदेखील वजन कमी कर, असा हट्ट केला जातो. अशा वेळी स्त्रियांनी दिवाळी आणि पाडव्याचे गिफ्ट म्हणून सोनं न मागता त्याबदल्यात त्यांच्याकडून जीमची मेंबरशीप मागा, असे मी सुचवेन.तू चित्रपटासाठी वजन वाढवलेस खरे, पण तुझे हे वजन कमी नाही झाले तर या गोष्टीची तुला भीती वाटली नाही का?- ज्यावेळी माझे वजन १६ किलोंनी वाढले. त्या वेळी मला स्वत:कडे पाहून खूप भीती मात्र वाटत होती. पण, हे वजन आम्ही जिम इन्स्ट्रकचरच्या सांगण्यानुसार वाढविले आहे. ते कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉटकर्टचा वापर केला नाही. अजूनही आम्ही त्यांच्या सांगण्यानुसारच डाएट फॉलो करतो आहे. नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्याचा प्रयत्न करते आहे.
या भूमिकेसाठी प्रिया झाली वजनदार
By admin | Updated: October 31, 2016 02:19 IST