Join us

आदिती बनणार राजकुमारी

By admin | Updated: June 30, 2014 22:22 IST

बॉलीवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीचे आजोबा (आईचे वडील) रामेश्वरा हैदराबाद संस्थानातील वानापथीचे राजा होते.

बॉलीवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीचे आजोबा (आईचे वडील) रामेश्वरा हैदराबाद संस्थानातील वानापथीचे राजा होते. ते सामाजिक चळवळीने प्रभावित होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नावासमोरून राजा हा शब्द काढून टाकला. असे करणारे ते पहिले राजा होते. पंडित नेहरूंनाही त्यांची ही कृती आवडली. त्यानंतर अनेक वेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले, तसेच आदितीच्या वडिलांचे वडील म्हणजेच अकबर हैदरी निजामांचे पंतप्रधान होते. त्यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका अदा केली होती. जेव्हा आदितीच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला, तेव्हा ती खूपच लहान होती. असे असले तरीही ती एक राजकुमारीच आहे; पण आता पडद्यावरही तिला राजकुमारीची भूमिका पार पाडण्याची संधी मिळणार आहे. 198क् मध्ये हिट ठरलेल्या ‘खुबसुरत’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ती राजकुमारीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचा दिग्दर्शक शशांक घोषने चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावण्यासाठी आदितीला साईन केले आहे.