Join us

‘व्हॉट अबाऊट सावरकर?’साठी प्राइम टाइमची घोषणा!

By admin | Updated: April 13, 2015 02:42 IST

‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटासाठी प्राइम टाइमची घोषणा करण्यात आल्याचा आरोप चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी केला आहे

पुणे : ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटासाठी प्राइम टाइमची घोषणा करण्यात आल्याचा आरोप चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीच हा निर्णय घ्यावा, हा योगायोग म्हणायचा का, असा प्रश्न टिष्ट्वटरवरून उपस्थित केला आहे.मराठी चित्रपटासाठीच्या प्राइम टाइमचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. या निणर्यावरून उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. काहींनी या निणर्याचे स्वागत केले, तर काहींना हा निर्णय पटलेला नाही. खासकरून काही बॉलीवूडकरांनी याबाबत जहाल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.मराठीत नवीन विषयांचे सिनेमे सध्या येऊ घातले आहेत. आगामी ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. या निर्णयाबद्दल सोशल साइटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीच हा निर्णय घ्यावा हा योगायोग आहे का, असा प्रश्न उपस्थित करून नवा वाद निर्माण केला आहे.रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेन्मेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित आणि रमेश कटारे, नितीन गावडे दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटाद्वारे एका महानायकाचे क्रांतिपर्व रेखाटण्यात आले आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर बेतला आहे़ अभिमान मराठे नावाच्या हुशार तरुणाच्या संगतीने चित्रपटाची कथा उलगडू लागते. स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या नेत्यांच्या-क्रांतिकारकांच्या बलिदानाची गाथा मांडणारा हा चित्रपट तरुण पिढीला मौलिक संदेश देतो. एका भ्रष्ट नेत्याकडून क्रांतिकारी नेत्याच्या झालेल्या अपमानाने पेटून उठणारा अभिमान अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना दिसेल. खऱ्या अर्थाने संघटित होणारी युवाशक्ती पाहता सावरकरांचे कार्य फलित होताना या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. शरद पोंक्षे, विवेक लागू, अविनाश नारकर, अतुल तोडणकर, सारा श्रवण, श्रीकांत भिडे आदी कलाकरांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत़ (प्रतिनिधी)