Join us

प्रसाद ओक लागला कामाला

By admin | Updated: March 27, 2017 05:13 IST

इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. आई या शब्दांचे सामर्थ्य सांगणारी ही

इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. आई या शब्दांचे सामर्थ्य सांगणारी ही कथा आधुनिक स्त्रीच्या जीवनाशी अगदी मिळती-जुळतीच म्हणावी लागेल. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरचा एक अवघड बुरुज काळ्याभिन्न अंधारात, आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून येणा?्या या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. मातृत्वाच्या याच धाडसाची गाथा प्रेक्षकांना हिरकणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहे. या चित्रपटाची घोषणा प्रसादने महिला दिनाचे निमित्त साधून केली होती. या चित्रपटाचे लवकरात लवकर चित्रीकरण सुरू होणार असल्याचे कळतेय. प्रसाद या चित्रपटासाठी जोरदार मेहनत घेत आहे.