Join us

शहा वीजकेंद्रातून नऊ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 00:04 IST

सिन्नर : तालुक्यातील शहा येथील १३२ केव्हीच्या वीजकेंद्रातून ९ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी महानिर्मितीकडून १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहानिर्मिती : १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा

सिन्नर : तालुक्यातील शहा येथील १३२ केव्हीच्या वीजकेंद्रातूनवीजउपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी महानिर्मितीकडून १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी शहा येथे १३२ केव्हीचे वीजकेंद्र उभारण्यात येत असून त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तथापि, या केंद्रातून उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा करण्यासाठी ११ केव्ही ऊर्जेचा भार वाहून नेणारे विजेचे खांब अद्याप उभे करण्यात आलेले नाही. त्यामुळे विजेचे खांब लवकर उभे केले नाही तर उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर हे खांब उभे करण्याचे काम सुरू करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती. त्यानुसार ९ वीजउपकेंद्रांना जोडण्यासाठी १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६ महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.१०८ किमीची लाईनशहा येथील वीजकेंद्रातून जवळचे वीज केंद्र लवकर जोडून सिन्नरच्या केंद्रावरील भार कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहा व देवपूर ही केंद्रे लवकर जोडली जातील. त्यानंतर वावी व पाथरे केंद्रे जोडल्यानंतर सोमठाणे व वडांगळी केंद्रे जोडली जातील. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, चासनळी व रांजणगाव (पोहेगाव) यातील जवळची वीजकेंद्रे अगोदर जोडली जातील. यासाठी एकूण १०८ किमी लांबीच्या वीजवाहिन्या असून त्यापैकी सिन्नर तालुक्यात ६२ किमी लांबीचे अंतर आहे.

टॅग्स :महावितरणवीज