Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूनम पांडे पुन्हा चर्चेत, अश्लील व्हिडीओ शूट केल्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरोधात केली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 16:47 IST

हॉट व्हिडीओमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हॉट व्हिडीओमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोव्यातील काणकोण पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हा अज्ञात व्यक्ती पूनम पांडेचा अश्लील व्हिडीओ शूट करत होता. त्यानंतर तिने त्या व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

तर दुसरीकडे, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला संघटनेने पूनम पांडेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. खरेतर पूनम पांडे चापोली डॅमवर एक अश्लील व्हिडीओ शूट करत होती, त्यावर या महिला संघटनेने ही कारवाई केली.

पूनमने नुकतेच बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. मात्र दोन आठवड्यांच्या आत तिच्या विवाहीत आयुष्यात अडचण आली. हनीमूनवर पूनम पांडेला तिच्या नवऱ्याने मारहाण केली. त्यानंतर पूनमने सॅम बॉम्बेच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सॅमला अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला.

पूनमने आपल्या नवऱ्यावर आरोप करताना म्हटले होते, सॅमने पुन्हा एकदा मला वाईटरित्या मारले होते की मला ब्रेन हॅमरेज झाला होता. मी कितीतरी दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होते. माझा चेहरा सूजला होता. माझ्या शरीरावर निशाण होते. सॅमने त्याच्या इंस्टाग्रामवरून माझे सर्व फोटो डिलीट केले आहेत. उलट मी असे काहीच केले नाही कारण मला वाटले शेवटी सर्व काही ठीक होईल.

पूनम पांडेने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले होते की, मला तुमच्यासोबत सात जन्म राहायचे आहे. २०११ साली भारतात क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर नग्न फोटो सोशल मीडियावर टाकण्याची घोषणा केल्यामुळे पूनम पांडे एका रात्रीत चर्चेत आली होती.

टॅग्स :पूनम पांडेगोवा