‘जोधा अकबर’मध्ये एकत्र काम केल्यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हा हृतिक रोशनला घेऊन ‘मोहनजोदडो’ या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. ‘मोहनजोदडो’च्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा या चित्रपटात फुलणार आहे. या चित्रपटासाठी हृतिकच्या हिरोईनचा शोध सुरू होता. हिरोईन म्हणून करिना कपूरची निवड करण्यात आल्याची चर्चा होती; परंतु ती अफवाच ठरली. ‘मोहनजोदडो’मध्ये हृतिकची हिरोईन म्हणून पूजा हेगडेला संधी देण्याचा निर्णय आशुतोषने घेतला आहे. ‘पूजा ही नितांत सुंदर आहे. हृतिक आणि पूजामुळे हा चित्रपट ताजातवाना वाटेल. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असे आशुतोषने सांगितले.
पूजा हेगडे होणार हृतिकची हिरोईन
By admin | Updated: July 14, 2014 05:30 IST