Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ओन्ली फॉर सिंगल्स' या वेब सीरिजसाठी पुजा बॅनर्जी होती पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 10:23 IST

त्येक दिग्दर्शकाची त्याच्या निर्मितीमध्ये कोणते कलाकार झळकतील, कोण प्रेक्षकांसमोर अभिनयाची जादू मांडू शकेल, याची एक कल्पाना डोक्यात असतेच. अगदी असंच, 'ओन्ली फॉर सिंगल्स' या वेबसीरिजसाठी दिग्दर्शक समर शेख  पूजा बॅनर्जीनेच काम करावे यावर ठाम होते.

सुपरहिट डीडीएलजेची सिमरन काजोल नसती तर? आदित्य चोप्रा यांनी दुसऱ्याच कोणाला तरी या भूमिकेसाठी निवडलं असतं तर? ते चित्र अगदीच वेगळं असतं आणि खरं तर त्याची कल्पनाही करवत नाही. त्याचप्रकारे, प्रत्येक दिग्दर्शकाची त्याच्या निर्मितीमध्ये कोणते कलाकार झळकतील, कोण प्रेक्षकांसमोर अभिनयाची जादू मांडू शकेल, याची एक कल्पाना डोक्यात असतेच. अगदी असंच, 'ओन्ली फॉर सिंगल्स' या वेबसीरिजसाठी दिग्दर्शक समर शेख  पूजा बॅनर्जीनेच काम करावे यावर ठाम होते.

याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना पूजा म्हणाली, "मला आठवतं, माझ्याकडे तारखाच नव्हत्या. पण, समरनेमला गळ घातली, काहीही करून या शोमध्ये काम करण्यासाठी मार्ग काढ असे ते म्हणाले. त्यांनी मला आणि इतर सर्वांनाच हे पटवून दिले की या भूमिकेसाठी मीच योग्य अभिनेत्री आहे आणि मी ही व्यक्तिरेखा साकारायला हवी. मुळात समर सारखी खूप कमी माणसं असतात. ते संयमी पण आहेत आणि गंमतीशीरही आणि आपल्याला नेमकं काय काय हवं याबद्दल त्यांच्यात फार स्पष्टता आहे. मी पहिली आणि एकमेव निवड होते, हे कळणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे."

ही आधुनिक वेब सीरिज सिंगल्सच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणार आहे. सहा मित्रांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या या शोमध्ये त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक प्रश्न आहे. 'ओन्ली फॉर सिंगल्स' तुमचे मनोरंजन करेल आणि तुम्हाला यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या मात्र तुम्ही स्वत:ला जोडून घेऊ शकाल अशा जगाची सैर घडवेल.

टॅग्स :पूजा बॅनर्जी