Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! अभिनेत्री पूजा बॅनर्जीने लग्नासाठी जमावलेले पैसे केले डोनेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 13:10 IST

पूजा आणि कुणालने एक महिन्यापूर्वीचं कोर्ट मॅरेज केले आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि अभिनेता कुणाल वर्मा यांचं लग्न 15 एप्रिलला होणार होते. मात्र लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले.  त्यामुळे पूजाच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पसरलं. मात्र आता इंटरनेटवर दोघांचे फोटो व्हायरल होतायेत. 

पूजा आणि कुणालने एक महिन्यापूर्वीचं कोर्ट मॅरेज केले आहे. सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे दोघांनी जे पैसे लग्नासाठी जमा केले होते ते डोनेट केले आहेत. पूजाने इन्स्टाग्राम पोस्टवर याची माहिती दिली. पूजाने लिहिले आहे की, ''तुमच्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. या कठीण काळात आम्ही एक छोटीशी मदत आपल्याला करित आहोत. आम्ही लग्नासाठी जे पैसे जमा केले होते ते डोनेट करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती अजिबात आनंद साजरा करण्याची नाही आहे. जेव्हा सगळे काही ठीक होईल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत मिळून आमचा आनंद साजरा करु.''  

 'देवों के देव महादेव' या मालिकेत पूजाने पार्वतीची भूमिका साकारली. पूजा आणि कुणाल 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी 2017 मध्ये साखरपुडा केला होता. 

टॅग्स :पूजा बॅनर्जी