Join us  

काळवीट शिकारप्रकरणातील साक्षीदाराला मनोरुग्ण ठरवण्याचा डाव

By admin | Published: June 30, 2015 11:28 AM

काळवीट शिकारप्रकरणात अभिनेता सलमान खानविरोधात साक्ष देणारे चोगराम हे मानसिकरित्या सक्षम नसल्याने त्यांचे या प्रकरणातून नाव वगळण्यात यावे अशी मागणी चोगराम यांच्या मुलाने केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

जोधपूर, दि. ३० - काळवीट शिकारप्रकरणात अभिनेता सलमान खानविरोधात साक्ष देणारे चोगराम हे मानसिकरित्या सक्षम नसल्याने त्यांचे या प्रकरणातून नाव वगळण्यात यावे अशी मागणी चोगराम यांच्या मुलाने केली आहे. 
काळवीट शिकारप्रकरणाची जोधपूर कोर्टात सुनावणी सुरु असून सोमवारी चोगाराम यांनी कोर्टासमोर हजर होणे अपेक्षीत होते. मात्र ते अनुपस्थित होते. चोगाराम यांच्या मुलाने कोर्टाकडे अर्ज करत वडिलांचे नाव प्रकरणातून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे. चोगाराम यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांच्यावर जोधपूर व अहमदाबादमध्ये उपचार झाल्याचा दावाही त्यांच्या मुलाने केला आहे. न्या. शिवानी भटनागर यांनी २७ जुलैपर्यंत चोगाराम यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधीत यंत्रणांना दिले आहे. या अहवालानंतरच चोगाराम यांचे प्रकरणातून वगळण्यात येईल की नाही यावर निर्णय घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले. 
काळवीट शिकारप्रकरणात चोगाराम (वय ६५) हे प्रमुख साक्षीदार असून शिकारीला जाण्यापूर्वी मी सलमानला थांबवण्याचा प्रयत्न केला होता असा दावा चोगाराम यांनी केला होता. आता चोगाराम यांना मानसिकरित्या अनफीट ठरवून सलमानला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत की काय यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.