Join us

कंगनाचा प्रियंकाला ठोसा!

By admin | Updated: March 25, 2015 01:05 IST

राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांच्या स्पर्धेत या वेळी कंगना राणावतचा ‘क्वीन’ आणि प्रियंका चोपडाचा ‘मेरी कॉम’ हे चित्रपट होते.

अनुज अलंकार ल्ल मुंबईसिनेसृष्टीत दोन अभिनेत्रींमध्ये स्पर्धा होण्याचे प्रसंग अनेकदा घडलेले आहेत. मात्र, राष्ट्रीय पुरस्कारातही दोन अभिनेत्रींमध्ये या वेळी स्पर्धा रंगली. राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांच्या स्पर्धेत या वेळी कंगना राणावतचा ‘क्वीन’ आणि प्रियंका चोपडाचा ‘मेरी कॉम’ हे चित्रपट होते. या दोन्ही चित्रपटांत स्त्री सक्षमतेवर प्रकाश टाकला होता. दोन्ही चित्रपटांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. आज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाल्यावर कंगनाने प्रियंकावर मात करीत ‘क्वीन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. कंगना आणि प्रियंकामध्ये मुकाबला होणार हे स्पष्ट होते. सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात कंगनाने या वर्षीचे सर्व महत्त्वाचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार प्रियंकाला न मिळता मलाच मिळणार आहेत, अशी घोषणा केली होती. मात्र पुरस्कार घोषित झाल्यानंतर टिष्ट्वटरवरून प्रियंकाने आपल्याला हरणे आवडत नाही, असे सांगतानाच क्वीनला मिळालेल्या यशात कोणा एकाचा वाटा नसून संपूर्ण टीमचे हे यश असल्याचे म्हटले. त्याचबरोबर प्रियंकाने टीमला शुभेच्छाही दिल्या.२००९ साली जेव्हा मधुर भांडारकर यांनी कंगना आणि प्रियंकाला घेऊन ‘फॅशन’ चित्रपटाची निर्मिती केली तेव्हापासूनच त्या दोघींत स्पर्धा सुरू झाली. चित्रपटाच्या कथेत कंगनाचे महत्त्व मोठे असूनही प्रियंकाच्या वाट्याची भूमिका मात्र जास्त होती. मात्र फॅशनसाठी प्रियंकाला उत्कृष्ट अभिनेत्री आणि कंगनाला सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यातले वाद जास्त रंगले. कारण त्या वेळी कंगनाचा अभिनय प्रियंकापेक्षा जास्त चांगला असल्याचे मानले जात होते. फॅशनला मिळालेले यश पाहून त्याचा सिक्वल करण्याची मधुर भांडरकरची योजना होती. मात्र दोघींमधले वाढते वाद पाहून ती योजना रद्द करावी लागली. प्रियंकाचा मेरी कॉम आणि कंगनाचा क्वीन जवळपास लागोपाठच प्रदर्शित झाले होते. दोघींच्याही यातील भूमिका दमदार होत्या. चित्रपटात कोणताही मोठा अभिनेता नसूनही बॉक्स आॅफिसवर कमाईच्या तुलनेत कंगनाच्या ‘क्वीन’ने बाजी मारली. राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने कंगनाने प्रियंकाला पुन्हा एकदा जोरदार मात दिली आहे.