Join us  

आमचं झालंय! अखेर मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे फोटो आले समोर, वधूच्या रुपात खूपच गोड दिसली मॉनिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 9:51 AM

1 / 8
सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एका नंतर एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या लग्नाची लगबग सुरू होती.
2 / 8
मुग्धा आणि प्रथमेश यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात चिपळूणमध्ये मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा पार पडला.
3 / 8
दरम्यान आता मुग्धाने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, आमचं झालंय.
4 / 8
या फोटोत मुग्धा वधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. नाकात नथ, मुंडावळ्या, केसांचा आंबाडा, खोप आणि हातात हिरव्या बांगड्या असा साजश्रृंगार तिने केला आहे.
5 / 8
तर मॉनिटर म्हणजेच प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता आणि त्यावर पिवळ्या रंगाची शाल, धोतर नेसले आहे. लाल रंगाचा पेशवाई फेटा घातला आहे. तोदेखील वराच्या गेटअपमध्ये राजबिंडा दिसत होता.
6 / 8
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम मोदक आणि मॉनिटर म्हणजेच प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती.
7 / 8
त्यानंतर त्यांनी साखरपुडाही उरकला होता. हे कळताच त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता ही सुरेल जोडी कायमची लग्नबंधनात अडकली आहे.
8 / 8
प्रथमेश आणि मुग्धाची भेट अगदी लहान वयातच सारेगमप शोमध्ये झाली. दोघांच्याही गाण्याचा जॉनर एक असल्याने नंतर त्यांनी एकत्र शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले. तेव्हाच दोघांचे सूर जुळले. मुग्धा-प्रथमेशने रेशीमगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी आहेत.
टॅग्स :सा रे ग म प