Join us  

Web Series : 'पंचायत ते कॉलेज रोमान्स'; २०२२ च्या टॉप १० IMDb rated वेब सिरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 5:10 PM

1 / 10
'पंचायत' सिरीजचा दिसरा पार्ट यावर्षी रिलीज झाला. हा दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला. गावातल्या ग्रामपंचायत आणि जनतेची कहाणी यामध्ये अगदी विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.
2 / 10
'दिल्ली क्राईम' ही क्राईम वर आधारित अप्रतिम वेब सिरीज. याचाही दुसरा सिझन यावर्षी रिलीज झाला होता. शेफाली शआह, रसिका दुग्गल, तिलोत्तमा यांच्या अभिनयाने सिरीज चांगलीच पसंत केली गेली.
3 / 10
'रॉकेट बॉइज' या सोनी लिव्हवर आलेल्या सिरीजचाही या यादीत समावेश आहे. सिरीजला IMDb ने ८.९ रेटिंग दिली आहे
4 / 10
'ह्युमन' ही थ्रिलर वेबसिरीज हॉटस्टारवर आहे. यामध्येही शेफाली शाह यांची मुख्य भुमिका आहे.
5 / 10
व्हुट वर प्रदर्शित झालेली 'अपहरण' ही वेब सिरीजही प्रचंड गाजली. यावर्षी सिरीजचा दुसरा पार्ट रिलीज झाला. ही एक थ्रिलर सिरीज असून प्रेक्षकांनी खूप पसंत केली.
6 / 10
'गुल्लक' ही आणखी एक अप्रतिम सिरीज. गुल्लकचा तिसरा सिझन यावर्षी रिलीज झाला. मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट यात मांडण्यात आली आहे. ही सर्वात जास्त रेट केलेली सिरीज आहे.
7 / 10
'NCR days' ही सुद्धा IMDb highest rated सिरीज आहे. कॉलेज जीवनावर आधारित ही सिरीज आहे.
8 / 10
'अभय' या लोकप्रिय सिरीजचा हा तिसरा सिझन यावर्षी रिलीज झाला. ही क्राईम थ्रिलर सिरीज झी ५ वर उपलब्ध आहे.
9 / 10
'कॅंम्पस डायरी' ही एमएक्स प्लेयर वरील सिरीज फक्त कॉलेज जीवन नाही तर इतर अनेक गंभीर विषयांवर बोलणारी आहे.
10 / 10
'कॉलेज रोमान्स' ही सोनी लिव्ह वरील सिरीज प्रेम, कॉलेजनंतरचे आयुष्य यावर आधारित आहे.
टॅग्स :वेबसीरिजनेटफ्लिक्सहिंदी