Join us  

मोहनीश बहलच्या लेकीचे फोटो पाहून व्हाल खल्लास, शेअर केले बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 6:02 PM

1 / 8
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चलती आहे. अनेकांचा बॉलिवूड डेब्यू झालाय आणि अनेक जण डेब्यूसाठी सज्ज आहे. यापैकीच एक म्हणजे, बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल याची लेक प्रनूतन बहल. प्रनूतनचा डेब्यू तर झाला. पण तिच्या पहिल्या चित्रपटाला म्हणावे तसे यश लाभले नाही.
2 / 8
अर्थात डेब्यू सिनेमाची चर्चा होवो ना होवो. प्रनूतन मात्र सध्या जाम चर्चेत आहे. शेवटी नूतन यांच्या नातीच्या चर्चा तर होणारच. प्रनूतनच्या नव्या फोटोशूटनं सध्या इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
3 / 8
‘नोटबुक’ या सिनेमातून डेब्यू करणाºया प्रनूतनने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.
4 / 8
प्रनूतन सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करत असते.
5 / 8
प्रनूतन हिची एक वेगळी ओळख म्हणजे, ती दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आहे. साहजिकच प्रनूतनकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
6 / 8
नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातच नूतन असल्याने साहजिकच तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा राहणार आहेत.
7 / 8
काजोलची आई तनुजा आणि नूतन दोघी बहीणी. या नात्याने काजोल आणि मोहनीश बहल मावस भाऊ-बहीण आहेत आणि याच नात्याने प्रनूतन काजोलची भाची आहे.
8 / 8
25 वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे. तिला नृत्याचीही आवड आहे. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसने प्रनूतनला लॉन्च केले होते.
टॅग्स :प्रनूतन बहलमोहनिश बहल