Join us  

Uorfi Javed : "मी जेव्हा पूर्ण कपडे घालते..."; उर्फी जावेदच्या शरीराची भयंकर अवस्था, थेट 'ते' फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 12:06 PM

1 / 10
अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच आपल्या अतरंगी कपड्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असते. काही लोक तिच्या फॅशनची स्तुती करतात. तर काही टीकेची झोड उठवतात. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. पण आता उर्फीने तिच्या कपड्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
2 / 10
उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत कमी कपडे घालण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. उर्फी नेहमीच शॉर्ट ड्रेसेसमध्ये का दिसते हे जाणून घेऊया... आपल्या हटके आणि भन्नाट लूकमुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. अनेकदा तिच्या विचित्र कपड्यांवर लोक संतापही व्यक्त करतात.
3 / 10
उर्फीने वुलन म्हणजेच लोकरीचे कपडे घातल्यानंतर तिच्या अंगावर रॅशेज उठले आहेत. उर्फीने दिलेल्या माहितीनुसार, 'बघा, ही समस्या आहे. जेव्हा मी लोकरीचे कपडे किंवा संपूर्ण कपडे घालते तेव्हा अशा प्रकारची एलर्जी होते आणि ही एक मोठी समस्या आहे. मी पूर्ण कपडे का घालत नाही हे आता तुम्हाला कळले असेल.'
4 / 10
'जेव्हा मी पूर्ण कपडे घालते. तेव्हा या प्रकारची रिएक्शन होते. त्याचा पुरावाही तुमच्यासमोर आहे. म्हणूनच मी न्यूड राहते. माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे' असं म्हटलं आहे. अलीकडेच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यावर अश्लीलता पसरवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
5 / 10
मुंबई पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. यावर उर्फी जावेद म्हणाली की, ती काहीही चुकीचे करत नाही. त्यामुळे तिला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. त्याचवेळी तिने आपले फोटो शेअर करून कपडे न घालण्याचे कारण एलर्जी असल्याचे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
6 / 10
उर्फी केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला होता.
7 / 10
उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं . 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हटलं आहे. उर्फी याआधी 'जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे' असं म्हणत चित्रा वाघ यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.
8 / 10
'मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नको आहे. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत' असं उर्फीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
9 / 10
उर्फीने चित्रा वाघ यांना यासोबतच एक सल्ला देखील दिला आहे. 'माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, जे अजूनही चालू आहेत' असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
10 / 10
चित्रा वाघ यांनी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा', अशा विषयाचे पत्र लिहून उर्फीच्या अश्लील कृत्याला आळा घाला असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
टॅग्स :उर्फी जावेदचित्रा वाघ