Join us  

मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 11:44 AM

1 / 7
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून 'रोशन सिंग सोढी' या नावाने घराघरात पोहोचलेला अभिनेता गुरूचरण सिंग १० दिवसांहून अधिक काळ बेपत्ता आहे. गेल्या १० दिवसांपासून त्याचा शोध लागलेला नाही. गुरुचरणच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. परंतु, अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता या अभिनेत्यानेच बेपत्ता होण्याचा 'प्लान' केला होता का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
2 / 7
अभिनेता गुरूचरण सिंग बेपत्ता होऊन १० दिवसांहून अधिक काळ झाला, तो कुठे आहे? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या मनात आहे. पोलीस पथके तपास करत आहेत, मग अद्याप अभिनेत्याचा शोध का लागला नाही.
3 / 7
गुरूचरण सिंग अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दिल्लीतील पोलिस सूत्रांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्लीतील पोलिस सूत्रांनी एका वेबसाइटला सांगितले की, 'त्याने आपला फोन पालम भागात सोडला. आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण यामुळे आम्हाला गुरुचरण सिंगचा शोध घेणे जास्त कठीण झाले आहे, कारण त्याचा फोन अभिनेत्याकडे नाही.
4 / 7
दिल्ली पोलिसांनी पुढे सांगितले की, सीसीटिव्ही फुटेजवरून आम्हाला समजले की, तो एका ई रिक्षातून दुसऱ्या ई रिक्षात जाताना दिसला. असे वाटत आहे की, त्याने सर्व आधीच प्लॅन केला आणि मग दिल्ली बाहेर गेला.
5 / 7
गुरुचरण सिंगला शेवटचे २२ एप्रिल रोजी पाहिले होते. त्याच्या वडिलांनी चार दिवसांनंतर हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यात ते म्हणाले की, 'माझा मुलगा गुरूचरण सिंग, वय: ५० वर्षे, 22 एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईला निघाला. ते विमान पकडण्यासाठी विमानतळावर गेला. तो ना मुंबईला पोहोचला ना घरी परतला आणि त्याचा फोनही लागत नाही. तो मानसिकदृष्ट्या स्थिर असून आम्ही त्याचा शोध घेत होतो, पण आता तो बेपत्ता आहे.
6 / 7
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गुरूचरण सिंग रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसला होता. या व्यक्तिरेखेद्वारे त्यांनी नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. तो शोच्या सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक होता आणि तो एक संस्थापक कलाकार सदस्य देखील होता. २०२० मध्ये, त्याने मालिकेला रामराम केला आणि त्याच्या जागी अभिनेता बलविंदर सिंग सूरी या शोमध्ये आला.
7 / 7
गुरूचरण सिंग गायब झाल्यामुळे त्याच्यासोबत मालिकेत काम केलेले त्याचे सहकलाकारही चिंतेत आहेत. जेनिफर मिस्त्री, समय शाह आणि मंदार चांदवडकर यांसारख्या अनेक स्टार्सनी त्याच्या बेपत्ता झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तो बरा होऊन लवकरच परतेल, अशी आशा त्यांना आहे.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा