Join us  

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 11:02 AM

1 / 7
प्रेमासाठी नायक काय करतो हे तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल, पण तुम्हाला बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल माहिती आहे का, जो आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला कब्रस्तानात घेऊन जायचा. ही स्टोरी फिल्मी वाटत असली तरी अगदी खरी आहे. कोण आहे हा अभिनेता आणि काय होते प्रकरण, काय आहे ही रंजक गोष्ट.
2 / 7
बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे संपूर्ण आयुष्य खुल्या पुस्तकासारखं आहे. दारूच्या नशेत बुडण्यापासून ते मुंबई बॉम्बस्फोटांच्या संदर्भात बेकायदेशीर शस्त्रे वापरणे आणि नंतर अनेक वर्षे तुरुंगात घालवणे अशा किस्स्यांमुळे संजय दत्त चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याच्या ३०८ गर्लफ्रेंड्स होत्या, ज्यांना तो कब्रस्तानात घेऊन गेला होता.
3 / 7
असं म्हणतात ना इमोशनल अत्याचार करुन मुलींना फसवणं सोप्पे आहे. संजय दत्तदेखील या शस्त्राचा वापर करायचा आणि मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. याबद्दल संजय दत्तने संजू चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खुलासा केला होता.
4 / 7
त्याने सांगितले होते की, मुलीला डेट केल्यानंतर तो तिला एका कब्रस्तानात घेऊन जायचा, जिथे तो त्याच्या आईच्या 'बनावट' कबरीवर रडायचा. इंडिया टुडेशी बोलताना त्याने खुलासा केला होता की, 'तो एका मुलीला डेट करायचा आणि नंतर तिला कब्रस्तानात घेऊन जायचा. तो म्हणायचा, 'मी तुला माझ्या आईला भेटायला घेऊन आलो आहे.'
5 / 7
या भेटीनंतर मुलगी संजूशी भावनिकरित्या जोडली जायची. खरेतर ती कबर त्याच्या आईची नव्हती.
6 / 7
त्याने आणखी एक घटना शेअर केली होती, जी त्याच्या एका मैत्रिणीशी संबंधित आहे. राजकुमार हिराणी म्हणाले, 'एका मुलीचे संजयसोबत ब्रेकअप झाले होते. यानंतर संजयने त्याच्या मित्राची नवीन कार घेतली आणि एक्स गर्लफ्रेंडच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारला धडक दिली. ही कार त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नवीन प्रियकराची होती, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते.
7 / 7
संजय दत्तच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो बॉलिवूडसोबतच साऊथच्या चित्रपटांमध्येही दिसतो. संजू बाबा दिग्दर्शक मारुतीच्या आगामी 'राजा साब' या चित्रपटात दिसणार असल्याचे समजते आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असेल, ज्यामध्ये संजय दत्त भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.
टॅग्स :संजय दत्त