Dilip Kumar Death: दिलीप कुमार यांचे हे आहेत टॉप १० चित्रपट By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 10:25 AM1 / 10दिलीप कुमार यांचा १९४९ साली शबनम हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाचे कथानक रंगूनच्या लढाईवर आधारीत आहे.2 / 10दिलीप कुमार यांचा सर्वात लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणजे मुघल-ए-आझम. हा सिनेमा १९६० साली रिलीज झाला होता. यात दिलीप कुमार यांच्यासोबत दुर्गा खोटे, पृथ्वीराज कपूर मुख्य भूमिकेत होते.3 / 10१९६१ साली गंगा जमना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती स्वतः दिलीप कुमार यांनी केली होती. वैजंयती माला आणि दिलीप कुमार यांनी या सिनेमात अभिनय केला होता.4 / 10१९९६ साली रिलीज झालेला चित्रपट राम और श्यामचे दिग्दर्शन तापी चाणक्य यांनी केले होते. यात दिलीप कुमार, प्राण, वहिदा रेहमान, मुमताज आणि निरूपा रॉय या दिग्गज कलाकारांनी काम केले होते.5 / 10१९५७ साली नया दौर हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर २००७ साली हा चित्रपट पुन्हा रंगीत स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दिलीप कुमार, वैजंयती माला आणि अझित-जीवन हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.6 / 10१९५८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट मधुमतीमधील दिलीप कुमार आणि वैजंयती माला यांच्या जोडीला खूप पसंती मिळाली होती.7 / 10देवदास चित्रपटात दिलीप कुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले आहे. हा चित्रपट १९५५मध्ये रिलीज झाला होता.8 / 10१९५५ साली उरन खटोला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत निम्मी, जिवन, टुन टुन या कलाकारांनी काम केले होते. 9 / 10दीदार या चित्रपटातील दिलीप कुमार आणि अशोक कुमार या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे कथानक एका तरूण मुलाच्या आयुष्यावर आधारीत आहे. 10 / 10१९८१ साली रिलीज झालेला चित्रपट क्रांतीला प्रेक्षकांचा खूप चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटातील मेरे देश की धरती हे गाणे खूप लोकप्रिय ठरले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications