थलैवा रजनीकांत मुंबईत ....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST
दक्षिणेतील जनतेचा देव म्हणजेच अभिनेता रजनीकांत अलीकडेच मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. तो आला अन् गर्दी झाली नाही, म्हणजे नवलच. नाही का?
थलैवा रजनीकांत मुंबईत ....
दक्षिणेतील जनतेचा देव म्हणजेच अभिनेता रजनीकांत अलीकडेच मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. तो आला अन् गर्दी झाली नाही, म्हणजे नवलच. नाही का? रजनीकांतचा चाहता कोण नाही? तो मुंबईत येणार म्हटल्यावर अशी अलोट गर्दी उसळली होती. थलैवा येणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी सेटवर अशी गर्दी केली होती. त्याची एक झलक सर्वांना पाहायची होती. त्याच्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे त्याने स्वत:चा गेटअप केला होता. कुणी त्याची छबी मोबाईलमध्ये घेत होता तर कुणी त्याच्यासोबत हात मिळवण्यासाठी पुढे येत होता. अखेर गाडीत बसताना त्याने सर्वांना बाय करून असे आभार मानले.