Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील रेवती आहे या प्रसिद्ध कलाकाराची लेक, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 07:00 IST

1 / 11
माझी तुझी रेशीमगाठ या मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे यश नेहाला परत मिळवण्यासाठी धडपडत आहे, मात्र दुसरीकडे सिम्मी काकू रेवतीला आपली सून बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
2 / 11
यशबरोबर लग्न करण्यासाठी सिम्मी रेवतीला आमिष दाखवते, त्यामुळे रेवती देखील सिम्मीचा प्रस्ताव स्वीकारते. आता तर रेवती चौधरींच्या पॅलेसमध्ये राहून परीचं मन जिंकत आहे. त्यामुळे रेवती यशच्या मनात जागा बनवणार का हे येत्या काही दिवसात कळेल.
3 / 11
रेवतीची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकर हिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. नुपूर दैठणकर हिने झी मराठीच्याच बाजी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या ऐतिहासिक मालिकेत तिने हिराची प्रमुख भूमिका साकारली होती.
4 / 11
नुपूरचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. तिचे आई वडील दोघेही कलाक्षेत्राशी निगडित आहेत.
5 / 11
वडील धनंजय दैठणकर हे सुप्रसिद्ध तबला वादक तसेच संतूर वादक आहेत. तर नुपुरची आई डॉ स्वाती दैठणकर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत.
6 / 11
जगभरात भरतनाट्यमचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. देशभरातच नव्हे तर अगदी प्रदेशात देखील त्यांनी मोठमोठे कार्यक्रम सादर केले आहेत.
7 / 11
नुपूरनाद या नृत्यालयाची त्यांनी स्थापना केली असून यात देश विदेशातील अनेक कलाकारांनी नृत्याचे धडे घेतले आहेत. मराठी सृष्टीतील बऱ्याचशा अभिनेत्रींनी त्यांच्या नृत्यालयातून भरतनाट्यमचे धडे गिरविले आहेत.
8 / 11
आपले पहिले गुरू हे आपले आईवडीलच आहेत ही नुपूरसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. बालपणापासूनच नुपुरने नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.
9 / 11
अभिनव विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासोबतच नुपुरने नृत्यामध्ये विशारद आणि अलंकार पदवी प्राप्त केली आहे. नालंदा नृत्यालयातून तिने मास्टर्सची डिग्री मिळवली. नि
10 / 11
नुपुरनाद या त्यांच्या डान्स अकादमीचा विस्तार वाढला आहे. त्याची जबाबदारी या दोघी मायलेकींनी समर्थपणे पेलली आहे.
11 / 11
सौरभ बाग सोबत नुपूरचे लग्न झाले असून त्यांना रेयांश हा गोंडस मुलगा देखील आहे. आपल्या कलेला वाव मिळावा अशी भूमिका तिच्या वाट्याला आल्याने माझी तुझी रेशीमगाठ मालिकेसाठी तिने आपला होकार कळवला.