Join us  

KBC चे पहिले विजेते हर्षवर्धन नवाथे आठवतात का? करोडपती झाल्यानंतर मराठी अभिनेत्रीशी केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 1:32 PM

1 / 8
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' (KBC) ची सुरुवात 2000 साली झाली. या २३ वर्षात शोने अनेक लोकांचं नशिब बदललं. कोणी लखपती तर कोणी करोडपतीही झाले. या शोमध्ये सर्वात पहिले करोडपती कोण होते माहितीये का?
2 / 8
त्यांचं नाव आहे हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe). ते तेव्हा अविवाहित होते आणि स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. नंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. हर्षवर्धन यांनी मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री सारिका हिच्याशी लग्न केले.
3 / 8
हर्षवर्धन नवाथे कुटुंबासह मुंबईतच राहतात. ते एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांचं मोठं नाव आहे.
4 / 8
हर्षवर्धन आणि सारिका यांना दोन मुलं आहेत. सारिका अनेकदा सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.
5 / 8
हर्षवर्धन नवाथे यांना करोडपती झाल्यानंतर ते चांगलेच लोकप्रिय झाले. अर्थात या नवीन शोचे ते पहिले करोडपती होते. या पैशातून त्यांनी परदेशात शिक्षण घेतले आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली. त्यांना अभिनयाच्या आणि मॉडेलिंगच्याही ऑफर्स आल्या होत्या.
6 / 8
KBC नंतर हर्षवर्धन यांचं IAS बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. शोची तयारी करण्यात व्यस्त झाल्याने ते IAS ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.
7 / 8
KBC च्या विजेतेपदानंतर ते बराच काळ वर्तमानपत्र, टीव्हीवर प्रसिद्ध होते. अनेक इव्हेंट्समध्ये त्यांना बोलावलं गेलं. एकदा एका इव्हेंटबाहेर खूप गर्दी होती. त्यांचा सुरक्षारक्षक आसपास नव्हता. तेव्हाच कोणीतरी त्यांच्या हाताला ब्लेड मारले. त्यांच्या हातातून रक्त वाहायला लागलं होतं.
8 / 8
तर त्यांची पत्नी सारिका नवाथे यांनी अनेक मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय हिंदीतही त्या झळकल्या आहेत. नुकतंच त्यांनी 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत बेबी आत्याची भूमिका साकारली.
टॅग्स :कौन बनेगा करोडपतीमराठी अभिनेता