Join us  

PHOTOS: 'आई कुठे काय करते' फेम अनघा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 1:59 PM

1 / 10
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अनघाने या पात्रानेदेखील अल्पावधीतच घराघरात पोहचली आहे.
2 / 10
अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahnagade) हिने साकारली आहे.
3 / 10
अश्विनी महांगडेला अनघाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील तिची अरुंधतीसोबत असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते.
4 / 10
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
5 / 10
नुकतेच अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात तिने वन शोल्डर वन पीस परिधान केला आहे.
6 / 10
या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
7 / 10
अश्विनी महांगडेचे गाउनमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
8 / 10
अश्विनी महांगडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेतील तिच्या अनघाच्या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे.
9 / 10
या मालिकेच्या आधी ती 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.
10 / 10
याशिवाय अश्विनी महांगडे हिने अस्मिता मालिकेत काम केले आहे. तसेच तिने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.
टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका