Join us  

'तुझ्यात जीव रंगला'मधील नवीन नंदिता वहिनी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा फोटो

By तेजल गावडे | Published: November 11, 2020 7:00 AM

1 / 10
तुझ्यात जीव रंगला मालिकेत नवीन ट्विस्ट पहायला मिळाला. पुन्हा मालिकेत नंदिता वहिनीची एन्ट्री झाली आहे.
2 / 10
आता नंदिता वहिनीच्या भूमिकेत अभिनेत्री माधुरी पवार पहायला मिळते आहे.
3 / 10
झी युवा वाहिनीवरील अप्सरा आली या शोची विजेती म्हणून माधुरीने आपले नाव गाजवले आहे.
4 / 10
नृत्याची विशेष आवड असलेल्या माधुरीच्या टिकटॉकवरील नृत्याच्या अदाकारीने अनेक चाहत्यांना घायाळ केले होते.
5 / 10
तिची हीच अदाकारी अनेक लावणी नृत्यामधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
6 / 10
मूळची सातारा जिल्ह्याची असलेली माधुरी आपल्या आई वडिलांच्या प्रोत्साहनाने नृत्यात निपुण झाली.
7 / 10
वडील जोतिराम पवार गवंडी काम करत. त्यामुळे ज्या गावी काम त्या गावी त्यांचा मुक्काम असायचा. तिथेच त्यांनी आपल्या मुलीला माधुरीला नृत्याचे धडे दिले पुढे यातूनच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा तिने गाजवल्या.
8 / 10
नृत्यासोबतच अभिनयाचे धडेही तिने गिरवले आहेत.
9 / 10
अजय गोगावले यांनी गायलेल्या पावसाळी या ढगांनी म्युझिक व्हिडीओमध्ये माधुरी झळकली आहे.
10 / 10
टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी युवा