Join us  

येळकोट येळकोट, जय मल्हार...! देवदत्त नागे खंडेरायाच्या दर्शनाला, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 5:14 PM

1 / 7
‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे याला आताश: कोण ओळखत नाही.
2 / 7
या मालिकेतील खंडोबा कुणीच विसरू श्कणार नाही. देवदत्त नागे यानेच खंडोबाची ही भूमिका साकारली होती.
3 / 7
नुकतीच देवदत्तने महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 7
जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या मुहूर्तावर देवदत्त जेजुरी गडावर पोहोचला.
5 / 7
मुळचा अलिबागचा असलेला देवदत्त सर्वप्रथम ‘देवयानी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण त्याला खरी ओळख दिली ती ‘जल मल्हार’ या मालिकेने.
6 / 7
आताश: देवदत्त बॉलिवूडमध्येही चांगलाच रमला आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटात त्याने सूर्याजी मालुसरे ही भूमिका साकारली होती.
7 / 7
लवकरच तो साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी सिनेमा ‘आदिपुरूष’मध्ये झळकणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत क्रिती सॅनन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.
टॅग्स :देवदत्त नागे