Join us  

पतीपासून लांब राहते राखी सावंत, म्हणून पडलीय एकटी, राहुल महाजनने सांगितल्या तिच्या विषयी धक्कादायक गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 2:28 PM

1 / 10
राखी सावंतने पहिल्याच दिवसापासून सर्वांचे मनोरंजन केले आहे. भांडण, भावनात्मक नाटक कितीही असो, प्रत्येक वेळी राखी गंमतीदार गोष्टी करत सा-यांचे मनोरंजन करत आहे.
2 / 10
रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी राखी कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीय. ना-ना त-हा करत ती सतत लक्ष वेधून घेते.
3 / 10
घरात राहुल महाजन जो स्वतःला राखीचा चांगला मित्र असल्याचे सांगतो. तोच राहुल महाजन वेळ पडल्यावर राखील सपोर्टही करत नाही.
4 / 10
राहुल महाजनने राखीचे अनेक किस्से सांगितले, 'राखी इतकी स्ट्रॉंग बनली आहे याला कारण म्हणजे तिच्या आयुष्यात ती खूपच एकटी पडली आहे.
5 / 10
गेली दोन वर्षे तिच्या पतीलाही भेटलेली नाही. राहुलने सांगितले की यापूर्वी कधीही तिला इतके एकटे पडल्याचे पाहिले नव्हते.
6 / 10
लग्नानंतर ती पतीबरोबर हनीमूनला जावू शकली नाही आणि दोन वर्षांपासून भेटली नाहीय. ती खूप मानसिकरित्या खचली गेली आहे.
7 / 10
खीची अशी इच्छा आहे की तिच्याबरोबर असलेली प्रत्येकजण तिच्याकडे परत यावी. कोणीही तिच्यापासून लांब जावू नये.
8 / 10
आज राखी खूप यशस्वी अभिनेत्री आहे. करोडो रुपयांची तिच्याकडे संपत्ती आहे, पण राखीकडे तिच्यावर प्रेम करणारी माणसं नाहीत.
9 / 10
राहुलने राखी विषयीच्या सगळ्या गोष्टी घरात सांगत तिच्यावर चर्चा करताना दिसला.
10 / 10
राखीच्या येण्याने यंदाचा सिझन तुफान हिट ठरत आहे.
टॅग्स :राखी सावंतबिग बॉस १४