Join us  

Amruta Khanvilkar : 'हॉटेलच्या रूममध्ये एकटी असली की....'; 'बस बाई बस'मध्ये अमृता खानविलकरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 6:32 PM

1 / 9
झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या बस बाई बस या कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली होती..
2 / 9
अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
3 / 9
खासदार सुप्रिया सुळेंसोबतचा पहिला एपिसोड रंगल्यानंतर आता सुबोध अमृताबरोबर मनोरंजनाची बस घेऊन सुसाट मनोरंजन करणार आहे.
4 / 9
बसमधील महिलांबरोबर अमृता चंद्रमुखी गाण्यावर थिरकताना पाहायला मिळणार आहे.
5 / 9
मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून महिलांच्या प्रश्नांची उत्तर देताना अमृताची पुरती दमछाक उडणार आहे.
6 / 9
अमृता खानविलकरच्या अनेक चांगल्या वाईट सवयींचा भांडा फोड आजच्या भागात होणार आहे.
7 / 9
कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये महिला तिला 'तुला भाकरी करता येते का चपाती?', 'घाबरट आहे का बिनधास्त?', असे बेधडक सवाल करताना दिसत आहेत.
8 / 9
हॉटेलच्या रुममध्ये एकटी असले की मी सगळे लाईट्स चालू करुन ठेवते, असा खुलासा अमृतानं केला आहे. त्याचा प्रोमो पाहायला मिळत आहे.
9 / 9
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमृताचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे आजच्या भागात प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. बस बाई बसच्या आजच्या भागात काय रंगत येणार हे रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :अमृता खानविलकरसुबोध भावे