Join us  

अनिता हंसनंदानीच्या बाळाचे नाव तुम्हाला कळले का? नाव आहे खूपच क्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 6:00 AM

1 / 6
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी नुकतेच आई-बाबा झाले. गेल्या 9 फेब्रुवारीला अनिताने गोंडस मुलाला जन्म दिला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
मुलाच्या जन्माची गोड बातमी रोहितने इन्स्टावर शेअर केली होती. यानंतर या बाळाचे काही फोटोही या जोडप्याने शेअर केले होते. पण त्याला बाळाचा चेहरा दिसला नव्हता. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
आता अनिता व रोहित यांनी एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आपल्या मुलाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबत मुलाच्या नावाचीही घोषणा केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
अनिता व रोहितने मुलाचे नाव आरव असे ठेवले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
अनिता व रोहितने शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच मजेदार आहे. यात अनिताच्या बेबी बम्पवर एक फटाका काळ्या रंगात रंगवलेला आहे. रोहित त्याची वात पेटवण्याची अ‍ॅक्शन करतो. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
पुढच्याच सेकंदाला फटाका जोरात फुटून अनिता आणि रोहितच्या हातात बाळ अवतरतं. तिघांचेही चेहरे फटाक्याच्या राखेने काळे झालेले दिसतात. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अनिता हसनंदानी