Join us  

आदेश बांदेकर ते श्वेता तिवारी, मुंबईत एकाच चाळीत राहायचे हे प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:14 AM

1 / 10
आदेश बांदेकर दार उघड बये म्हणत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात ‘भावोजी’ म्हणून प्रसिद्ध असलेलं आदेश बांदेकर यांच्यातला कलाकाराचा शोध याचा अभ्युदय नगरचा चाळीमध्येच झाला. अभ्युदयनगरमधील लहानशा घरामध्ये आदेश यांचं बालपण गेलं. या चाळींमधील गणपती उत्सव गरब्यासारख्या कार्यक्रमांमध्ये आदेश बांदेकर नेहमीच भाग घ्यायचे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
याच चाळीतल्या गणेशोत्सवात आदेश बांदेकर नारळ विक्रीचे काम करायचे. चाळीतल्या सर्वसामान्य मुलांप्रमाणे वर्गणी काढण्यापासून, मिरवणुकीत नाचण्यापर्यंत अनेक गोष्टींचा आदेश यांअनुभव घेतला आहे. शिवाय त्यांच्यातील शिवसैनिकांचा जडण घडण देखल इथूनच झाली. इतकाच नव्हे या चाळीशी संलग्न असणाऱ्या अभ्युदय बँकेचे ब्रँड अम्बॅसॅडर देखील आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
विवेक सांगळे भाग्य दिले तू मला य मालिकेतील राज म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे देखील या चाळीतच लहानाचा मोठा झाला, विशेष म्हणजे छोट्या पडद्यावरील हा सुपरस्टार असूनही आजही या चाळीमधील या लहानशा घरात आपल्या आई वडिलांसोबत राहतो. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
विवेकच शालेय शिक्षण देखील त्याचा घराचा हाकेच्या असणाऱ्या शिवाजी शाळेतच झालं आहे. या परिसरात विवेक आजही रस्त्यावर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वावरताना दिसतो. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
श्वेता तिवारी तुम्हाला हे नाव ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना. पण होय, हिंदी मालिका चित्रपट विश्वातील आघाडीची अभिनेत्री श्वेता तिवारीचा देखील चाळीशी सबंध आहे. आपल्या स्ट्रगलिंग काळात श्वेता या इमारतीती आपल्या पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरी आणि मुलगी पलकसोबत राहायला होती. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
याचदरम्यान श्वेताला स्टार प्लस वरील सुपरहिट महिला कसौटी जिन्दगी कि मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची प्रेरणा हि व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. हि मालिका चालू असताना देखील ती काही काळ या ठिकाणी राहायला होती. हीच मलिक तिचा करियरला कलाटणी देणारी ठरली. एक प्रकारे हे घर तिच्यासाठी लकी ठरलं असा म्हणता येईल. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
केदार शिंदे मराठीतले आघाडीचे दिगदशक निर्माते केदार शिंदे यांचं बालपण देखील अभ्युदय नगरचाचाळीमध्ये गेलं. या चाळीमध्ये जन्मलेल्या खेळल्या बागडलेल्या केदार शिंदे यांनी जेव्हा पाहिलं चित्रपट अगं बाई अरेच्या दिग्दर्शित केला तेव्हा या चित्रपटाचं शूटिंग साठी देखील याच चाळीची निवड केली. अगं बाई अरेच्या मध्ये संजय नार्वेकर राहत असलेले घराचं चित्रीकरण याच अभ्युदयनगर मधील चाळीमध्ये करण्यात आले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
प्रणव रावराणे झी मराठी वरील हास्यसम्राट या शो चा विजेता व दुनियादारी चित्रपटात सॉरी हि भूमिका गाजवणारा अभिनेता प्रणव रावराणे ही याच चाळीत वाढलेल्या कलाकारांपैकी एक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
प्रणव आपल्यातील कलागुणांचा जडण घडणी श्रेय या चाळीलाच देतो. प्रणवने २०१६ मध्ये अभिनेत्री अमृता सकपाळ सोबत लग्न केलं. विशेष म्हणजे आजही हे दोन्ही कलाकार या चाळीतील लहानशा घरात राहतात. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
नम्रता संभेराव हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव देखील याचा काळाचौकी परिसरातील... तिचा जन्म जरी अभ्युदय नगरचा चाळीत झाला नसला तरी चाळीला लागनूच असलेल्या वसाहतीत नम्रता लहानाची मोठी झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :आदेश बांदेकरश्वेता तिवारीनम्रता आवटे संभेरावकेदार शिंदे