Join us  

'आई कुठे काय करते' फेम अनघाचा नवा लूक होतोय व्हायरल, मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 6:00 AM

1 / 10
आई कुठे काय करते मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 10
'आई कुठे काय करते'मध्ये अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारली आहे.
3 / 10
नुकताच अनघाचा नवा लूक समोर आला आहे. खरेतर अश्विनीने नवीन फोटोशूट केले आहे.
4 / 10
या नव्या फोटोशूटमध्ये अश्विनी महांगडे खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
5 / 10
अश्विनीच्या या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
6 / 10
अश्विनी महांगडेला अनघाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील तिची अरुंधतीसोबत असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते.
7 / 10
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
8 / 10
अश्विनी महांगडे हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेत पहायला मिळते आहे. या मालिकेतील तिच्या अनघाच्या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळते आहे.
9 / 10
या मालिकेच्या आधी ती 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले होते.
10 / 10
याशिवाय अश्विनी महांगडे हिने अस्मिता मालिकेत काम केले आहे. तसेच तिने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.
टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका