Join us  

Divya Khosla Kumar Photos: टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नीचं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 4:54 PM

1 / 8
टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. 34 वर्षाच्या दिव्याच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील.
2 / 8
अलीकडे दिव्या ‘डिझाईनर’ गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा बोल्ड आणि रिव्हिलिंग ड्रेस पाहून सगळेच थक्क झालेत.
3 / 8
इन्स्टावरही दिव्याने या ड्रेसमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. यात दिव्या गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये किलर पोझ देताना दिसतेय.
4 / 8
लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळलेली दिव्याने ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. या चित्रपटात दिव्या मुख्य हिरोईनची भूमिका साकारताना दिसली होती.
5 / 8
2004 साली अनिल शर्माच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथींयों’ या चित्रपटाद्वारे दिव्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याचवर्षी ‘लव्ह टुडे’ या साऊथच्या चित्रपटाद्वारे तिने टॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
6 / 8
2005 मध्ये तिने टी सीरिजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा झाला.
7 / 8
लग्नानंतर दिव्याने अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. रॉय, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मरजांवा असे अनेक चित्रपटाची निर्मिती तिने केली.
8 / 8
2014 मध्ये तिने दिग्दर्शनात पाऊल ठेवत, ‘यारियां’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. 2016 मध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिने केलं.
टॅग्स :दिव्या कुमार