Join us  

तो साऊथचा, ही महाराष्ट्राची; मग कशी सुरू झाली महेश बाबू व नम्रता शिरोडकरची लव्हस्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 1:37 PM

1 / 9
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस. 2005 साली लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांची प्रेम कहाणी कोणत्याही परी कथेपेक्षा कमी नाही.
2 / 9
महेश बाबू साऊथचा अन् नम्रता मराठी. मग ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली? कशी फुलली? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ही लव्हस्टोरी सुरू झाली होती एका चित्रपटाच्या सेटवर.
3 / 9
होय, बॉलिवूडमध्ये फार काही यश मिळत नाहीये, हे पाहून नम्रता शिरोडकरनं साऊथकडे मोर्चा वळवला आणि वामसी हा तेलगू सिनेमा साईन केला. हा सिनेमा साईन केला नसता तर कदाचित महेशबाबूच्या आयुष्यात एक मराठी मुलगी आलीच नसती.
4 / 9
‘वामसी’ या चित्रपटात महेशबाबू हा नम्रताचा हिरो होता. त्याआधी महेशबाबूचं नावंही तिने ऐकलं नव्हतं. महेश बाबू व नम्रता ‘वामसी’च्या मुहूर्ताला पहिल्यांदा भेटले आणि या पहिल्याच भेटीत महेशबाबू नम्रतावर लट्टू झाला.
5 / 9
चित्रपटाचं शूटींग सुरू झालं आणि महेशबाबू नम्रताच्या प्रेमात जणू वेडा झाला. चित्रीकरणानंतर बराच वेळ ते दोघं एकत्र घालवू लागले.
6 / 9
पण जगापासून दोघांनीही आपली लव्हस्टोरी लपवून ठेवली. अगदी महेशबाबूने त्याच्या घरच्यांपासूनही प्रेमप्रकरण लपवलं होतं. पाच वर्षे असंच चाललं. पण यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
7 / 9
अर्थात लग्नाआधी महेशबाबूची एक अट होती. होय, लग्नानंतर नम्रताने सिनेमा सोडून घर सांभाळावं, अशी अट त्याने नम्रतापुढे ठेवली. नम्रताचं फिल्मी करिअर फार काही समाधानकारक नव्हतंच. तिने महेशबाबूची ही अट लगेच मान्य केली.
8 / 9
महेशने सर्वप्रथम आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल त्याच्या बहिणीला सांगितलं आणि त्याच्या बहिणीने नम्रताच्या घरातल्यांना या लग्नासाठी तयार केलं. 10 फेब्रुवारी 2005 मध्ये त्यांनी लग्न केलं.
9 / 9
नम्रता महेशपेक्षा 4 वर्ष मोठी आहे परंतु, जेव्हा प्रेम होतं तेव्हा वयाचा विचार केला जात नाही. त्या दोघांना गौतम आणि सितारा ही दोन मुलं झाली.
टॅग्स :महेश बाबूनम्रता शिरोडकर