Join us  

सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्नाच्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, रिलीज डेटही आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 7:21 PM

1 / 7
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'मिशन मजनू' चे पोस्टर रिलीज झाले असून त्यासोबत रिलीज डेटही समोर आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचा चित्रपट 'मिशन मजनू' चित्रपटगृहांऐवजी थेट OTT वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या 'मिशन मजनू' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या पोस्टरमध्ये सिद्धार्थने पठाणी सूट घातला असून त्याच्या हातात पिस्तूल आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एका धाडसी एजंटची न ऐकलेली कथा. 20 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर मिशन मजून. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो धर्मा प्रोडक्शनच्या 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रारश्मिका मंदाना