Join us  

Indian Police Forceमध्ये शिल्पा शेट्टीची एन्ट्री, रोहित शेट्टीच्या युनिव्हर्सची पहिली महिला कॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 7:47 PM

1 / 7
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता एका डॅशिंग अवतारात रसिकांसमोर येणार आहे.
2 / 7
गेल्या वर्षी 'हंगामा २'द्वारे ओटीटीवर हंगामा करणारी शिल्पा पुन्हा ओटीटीवर धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.
3 / 7
लवकरच तिचे 'निकम्मा' आणि 'सुखी' हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. नुकताच तिनं आपला व्हिएफएक्स स्टुडिओही सुरू केला आहे.
4 / 7
रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये शिल्पा झळकणार असल्याचं रिव्हील करण्यात आलं आहे. 'इंडियन पोलीस फोर्स'द्वारे रोहित ओटीटीवर डेब्यू करणार असल्यानं सर्वांनाच या प्रोजेक्टबाबत उत्सुकता आहे.
5 / 7
शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त यात सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे.
6 / 7
'इंडियन पोलीस फोर्स'मधील आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत शिल्पानं मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
7 / 7
कॉप युनिवर्सच्या माध्यमातून प्रथमच रोहित शेट्टीसोबत काम करत असल्यानं सुपर थ्रिल्ड अनुभवत असल्याचंही तिनं लिहिलं आहे.
टॅग्स :शिल्पा शेट्टीरोहित शेट्टीसिद्धार्थ मल्होत्रा