Join us  

प्रेमासाठी काही पण! लग्नासाठी केला इस्लामिक धर्माचा स्वीकार; बिकिनीमुळे चर्चेत आलेली 'ही' अभिनेत्री आहे रविंद्रनाथ टागोरांची नात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 4:36 PM

1 / 10
बॉलिवूड सेलिब्रिटींचे किस्से आणि वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आज अशाच एका ६०-७०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
2 / 10
'कश्मीर की कली', 'आराधना', 'अनुपमा', 'चुपके-चुपके' यांसारख्या सुपरहिट सिनेमात काम करून या प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
3 / 10
अभिनयाबरोबर चर्चा होती ती या अभिनेत्रीच्या सौंदर्याची. अभिनेत्रीचे मोहात पाडणारे डोळे आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली होती.
4 / 10
सत्यजीत रे यांच्या 'अपुर संसार' या बंगाली चित्रपटातून या अभिनेत्रीने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत या अभिनेत्रीने सिनेसृष्टी दणाणून सोडली होती.
5 / 10
मोठ्या पडद्यावर बिकिनी घालून शूट करणारी ही पहिली अभिनेत्री होती. तिच्या बिकिनी शूटची प्रचंड चर्चा रंगली होती. यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण, यामुळेच तिच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली होती.
6 / 10
आजकाल अगदी सामान्य वाटणाऱ्या बिकिनीवरुन मात्र तेव्हा गदारोळ झाला होता. अभिनेत्रीने बिकिनीत शूट केल्यामुळे हा विषय संसदेपर्यंत गेला होता.
7 / 10
या सगळ्या प्रकारानंतर अभिनेत्री तिच्या आगामी सिनेमांच्या स्क्रिप्ट निवडताना खबरदारी घ्यायची, असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.
8 / 10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने भारतीय क्रिकेटरसोबत संसार थाटला. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने प्रेमासाठी आणि लग्नासाठी धर्मपरिवर्तन करून मुस्लीम धर्म स्वीकारला होता.
9 / 10
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आहेत. त्यांनी क्रिकेटर मंसूर अली खान यांच्याशी विवाह करण्यासाठी धर्म बदलला होता.
10 / 10
शर्मिला या रविंद्रनाथ टागोर यांच्या नात आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या लहान भावाच्या त्या नात आहेत.
टॅग्स :शर्मिला टागोररवींद्रनाथ टागोरसेलिब्रिटी