सेलेब्सचे एअरपोर्ट लूक़....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST
मुंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते.
सेलेब्सचे एअरपोर्ट लूक़....
मुंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते. एअरपोर्टवर सूरज पांचोलीचा असा कूल अंदाज दिसून आला. अभिनेता डॅनी देखील एअरपोर्टवर अशा डॅशिंग अंदाजात स्पॉट झाला. सनी देओलचा एअरपोर्टवरचा लूक एकदम हटके होता. पद्मिनी कोल्हापूरे ही एअरपोर्टवरून जाताना मोबाईलवरून बोलत जाताना दिसली. डिंपल कपाडियाचा हा सुपरकूल अंदाज खरंच सुंदर होता. लाल रंगाचा कोट आणि काळ्या रंगाचा शर्ट असा जबरदस्त कॉम्बिनेशनमध्ये करण जोहर एअरपोर्टवर दिसून आला. आदिती राव हैदरी अशा कॅज्यूअल अंदाजात एअरपोर्टवर दिसून आली. तिचा हा लूक पाहाण्यासारखा होता. जॉन अब्राहम याने कारमधून जाता जाता अशी पोझ फोटोग्राफर्सना दिली.