Join us  

या कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आलिया भट्टची ही बहिण, प्रसिद्धीपासून दूरच राहणे करते पसंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 3:32 PM

1 / 10
महेश भट्ट यांच्या लेकींनीही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2 / 10
पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्या बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं.
3 / 10
पूजा आणि आलिया या महेश भट्ट यांच्या लेकी आहेत हे सर्वश्रुत आहे.
4 / 10
मात्र महेश भट्ट यांना तिसरी लेकही आहे आणि तिच्याबाबत फारसं कुणालाही माहिती नाही.
5 / 10
महेश आणि सोनी राजदान यांच्या दोन लेकी आहेत.एकीचं नाव शाहिन तर दुसरीचे नाव आलिया भट्ट असं आहे.
6 / 10
1988 साली शाहिनचा जन्म झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे.
7 / 10
त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली.
8 / 10
एका मुलाखतीमध्ये आलियानं याबाबत कबुली दिली होती. डिप्रेशनसह निद्रानाश या आजाराने शाहिन त्रस्त होती.
9 / 10
शाहिन कधीही अभिनय करताना दिसली नाही. मात्र ती या ना त्या कारणामुळे सिनेमाशी जोडली गेली आहे.
10 / 10
'जिस्म-2', 'जहर' या सिनेमासाठी तिने डायलॉग्स लिहले होते.तसंच 'राज-3' सिनेमात शाहिननं सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
टॅग्स :आलिया भटमहेश भट