Join us  

Photos : मंदिरा बेदी व राज कौशल यांचे हे फोटो पाहून तुमचंही मन जाईल हेलावून!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 5:30 PM

1 / 9
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. (Raj Kaushal Passed Away)
2 / 9
पतीच्या अकाली निधनाने मंदिराला जबर धक्का बसला आहे. त्यांच्या मित्रांसाठीही हा मोठा धक्का आहे.
3 / 9
राज कौशल आणि मंदिराचा प्रेमविवाह होता. 1999 साली दोघांनीही लग्नगाठ बांधली होती.
4 / 9
राज आणि मंदिरा यांची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच रंजक होती. आधी मंदिराच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. पण लग्न करेल तर राजशीच या मंदिराच्या हट्टापायी अखेर त्यांनी लग्नासाठी संमती दिली होती.
5 / 9
लग्नानंतर राज व मंदिराचा संसार आनंदात सुरू होता. लग्नानंतर मंदिराला लगेच आई व्हायचे नव्हते. राज यांनीही तिच्या या निर्णयाचा आदर केला होता.
6 / 9
मंदिरा तिच्या अटींवर जगणारी होती, राज यांनी तिला तिच्या प्रत्येक निर्णयाला खंबीर पाठींबा दिला. ते कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
7 / 9
लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर मंदिराने एका मुलाला जन्म दिला होता. गेल्यावर्षी या जोडप्याने एक मुलगीसुद्धा दत्तक घेतली होती.
8 / 9
मंदिरा आणि राज दोघेही आपल्या मित्रपरिवारा सोबत धम्माल मस्ती करायचे. रविवारीच दोघांनी मित्रांसोबत पार्टी केली होती.
9 / 9
राज यांनी जाहिराच्या क्षेत्रामध्ये खूप लोकप्रियता मिळवली होती. आजही त्यांची जाहिरात एजन्सी ही आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते.
टॅग्स :मंदिरा बेदी