Join us  

'पुष्पवल्ली' फेम अभिज्ञा भावेचा नवरा झाला कॅन्सरमुक्त; ट्रिटमेंटनंतर बदलेला लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:31 AM

1 / 7
अभिनेत्री अभिज्ञा भावे मेहुल पै सोबत जानेवारी २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नाला काही दिवसातच त्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले. अभिज्ञाच्या नवऱ्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले.
2 / 7
आता मेहुल पैची तब्येत पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे. त्याची तब्येत उत्तम आहे आणि सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे.
3 / 7
मेहुल पै आता कामावर परतला असून तो स्वतःची काळजी घेतो आहे, पथ्य पाळत आहे, असे अभिज्ञा भावेने एका मुलाखतीत सांगितले होते.
4 / 7
अभिज्ञा भावे आणि मेहुल पै सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नुकताच मेहुलच्या ट्रिटमेंटनंतरचा बदललेला लूक समोर आला आहे.
5 / 7
आधीचा मेहुल आणि ट्रिटमेंटनंतरच्या मेहुलला पाहून चाहते चकीत झाले आहेत.
6 / 7
अभिज्ञा भावे हिने अगदी मेहुलच्या ट्रिटमेंट दरम्यानचे सकारात्मक फोटो आणि व्हिडीओ सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे त्याची होणारी प्रगती पाहून चाहत्यांनी आनंद आणि प्रेम व्यक्त केले आहे.
7 / 7
अभिज्ञा आणि मेहुलने आयुष्यात आलेल्या संकटावर एकमेकांना खंबीरपणे साथ देत सामना केला आहे.
टॅग्स :अभिज्ञा भावे