Join us  

Adipurush : प्रभासला मिळाले १०० कोटी, तर सैफला फक्त 12 कोटी, जाणून घ्या 'आदिपुरुष'मधील कलाकारांचं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 2:01 PM

1 / 8
प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan) चा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपट वादात अडकला आहे. टीझर रिलीज झाल्यापासून निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटातील प्रभास आणि सैफ अली खानचा लूक ट्रोल होत आहे.
2 / 8
या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसलेल्या VFXवरुन सोशल मीडिया यूजर्सनी चित्रपटाला वाईट पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटीझन्स चित्रपटातील VFX आणि सैफच्या पात्रावरुन निर्मात्यांना धारेवर धरत आहेत.
3 / 8
आदिपुरुषच्या टीझरमध्ये सैफ अली खानचा लूक पूर्णपणे विचित्र दिसत आहे. रावणाच्या अवतारात सैफचे केस लहान आहेत. त्याने काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे आणि तो खूपच भयानक दिसतोय. वादात सापडलेल्या आदिपुरुषचा बजेट ५०० कोटीहुन अधिक आहे. यातील कलाकारांनीही तगडी फी वसूल केली आहे.
4 / 8
जेव्हा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा प्रभासच्या चित्रपटातील फीबाबतही अनेक बातम्या समोर आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी प्रभासने 100-150 कोटी रुपायांचं मानधन घेतलं आहेत. या चित्रपटात प्रभास 'राम'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी प्रभासला मोठी रक्कम दिली आहे.
5 / 8
चित्रपटात रावणच्या भूमिकेत ट्रोल होणाऱ्या सैफ अली खाननं 12 कोटींचं मानधन घेतलं आहे. म्हणजेच प्रभास आणि सैफच्या फीमधला फरक बघितला तर सैफची फी खूपच कमी आहे.
6 / 8
या चित्रपटात प्रभाससोबत क्रिती सॅनन दिसणार आहे. ती यात जानकीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी तिला फक्त 3 कोटी रुपये देण्यात आलं आहेत.
7 / 8
सनी सिंग देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. त्यांने दीड कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटात सनी सिंह 'लक्ष्मण'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय सोनल चौहानही या चित्रपटात आहे. या चित्रपटासाठी तिनं फक्त 50 लाख रुपये आकारले आहेत.
8 / 8
दिग्दर्शक ओम राऊतचा हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत, सनी सिंह निज्जर लक्ष्मणच्या भूमिकेत, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :आदिपुरूषप्रभाससैफ अली खान क्रिती सनॉन