Join us  

समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 6:19 PM

1 / 8
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय २०२१मध्ये घटस्फोट घेत विभक्त झाली. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांनाही धक्का बसला होता. घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि समांथा कधीच एकत्र दिसले नाहीत.
2 / 8
समांथापासून विभक्त झाल्यानंतर आता दोन वर्षांनी नागा चैतन्य पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आणि नागाचैतन्यचे वडील नागार्जुन आपल्या लेकाचं दुसरं लग्न लावून देण्याच्या तयारीत आहेत.
3 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, नागार्जुन यांची होणारी सून ही एका व्यावसायिकाची मुलगी असून तिचा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. पण, अद्याप याबाबत नागाचैतन्य किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
4 / 8
समांथाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यचं नाव प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर जोडलं गेलं होतं. नागाचैतन्य मेड इन हेवन फेम शोभिता धुलिपालाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एका रेस्टॉरंटमधील त्यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
5 / 8
शोभिता ही एक लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आहे. २०१३ मध्ये तिने मिस इंडिया हा किताब नावावर केला होता. ‘मेड इन हेवन’ या सुपरहिट वेब शोमध्ये ती दिसली होती. द नाईट मॅनेजर या वेब सीरिजमध्येही शोभिता महत्त्वाच्या भूमिकेत होती. शोभिताने अनेक हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटात काम केलं आहे.
6 / 8
नागा चैतन्यला डेट करत असल्याच्या चर्चांवर शोभिताने खुलासा केला होता. “मी सध्या फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मला चांगले चित्रपट करायचे आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या अफवांची मला पर्वा नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे माझ्यासाठी काळजी करण्यासारखे काही नाही,” असं तिने सांगितलं होतं.
7 / 8
“नागा चैतन्य सोबत रिलेशनशिपमध्ये आहे की नाही?” असे शोभिताला थेट विचारण्यात आलं होतं. त्यावेळी शोभिता म्हणाली, 'ही माझी वैयक्तिक बाब आहे. मी आणि माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला स्पष्ट करण्याची गरज नाही. ते सार्वजनिक डोमेनमध्ये आणण्याची मला काहीच गरज वाटत नाही. मला माझ्या आयुष्याबद्दल बोलण्याची किंवा स्पष्ट करण्याची गरज नाही.'
8 / 8
नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील प्रेम बहरलं होतं. परंतु, लग्नानंतर अवघ्या चारच वर्षांत घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
टॅग्स :समांथा अक्कीनेनीनागार्जुनसेलिब्रिटी