1 / 10मौनी रॉय ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक मोठी अभिनेत्री आहे, जी बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या.2 / 10नागिन हा शो करण्यापूर्वी अभिनेत्रीच्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा तिला वाटलं की, आयुष्य संपलं... ती आता वाचू शकणार नाही. 'नागिन शो सुरू करण्यापूर्वी मी गंभीर आजारी होते.'3 / 10'मी झलक दिखला जा 9 शो पूर्ण केला होता. मला L4-L5 ची समस्या होती ज्यामुळे मी सरळ उभं राहू शकत नव्हते. मी दिवसातून 30 गोळ्या घेत असे. इंजेक्शन्स दिली गेली.'4 / 10'मी जवळपास 3 महिने अंथरुणाला खिळून होते. माझं वजन वाढलं होतं. याच दरम्यान मला नागिन या शोसाठी कॉल आला' असं म्हणत अभिनेत्रीने तिला आलेला भयंकर अनुभव सांगितला आहे.5 / 10'नागिन शोच्या आधी मी देवों के देव महादेव हा शो केला होता. म्हणूनच मला आणखी एक फँटसी फिक्शन करायचं नव्हतं. मी जेव्हा प्रॉडक्शन हाऊसमध्ये गेले तेव्हा मला ही स्टोरी सांगितली गेली.'6 / 10'मी त्यांना सांगितलं की, मला एकता मॅडमला एकदा भेटायचं आहे. मला आठवतं की मी जेव्हा एकता मॅडमला भेटले तेव्हा त्या या प्रोजेक्टबद्दल खूप पॅशेनेट होत्या. त्यांनी मला स्टोरी सांगितल्यावर मी त्यासाठी तयार झाले.'7 / 10''नागिन हा काही महिन्यांचा शो होता, पण लोकांना तो इतका आवडला की तो 11 महिने चालला. या शोचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे' असंही मौनी रॉयने म्हटलं आहे. 8 / 10मौनीने 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती 'जरा नचके देखा', 'कस्तुरी', 'जुनून' सारख्या शोमध्येही दिसली होती. मालिकांव्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.9 / 10मौनी रॉय सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो हे शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर घायाळ होतात. 10 / 10