Join us  

सध्या काय करतेय 'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री? जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 3:29 PM

1 / 9
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे श्रुती नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
2 / 9
सिनेइंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण करणारी श्रुती सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.
3 / 9
श्रुती मराठेने मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. शेवटची ती धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव सिनेमात झळकली.
4 / 9
मात्र ती सध्या काय करते आहे, हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
5 / 9
कलाविश्वात बराच काळ गायब असलेली श्रुती मराठे सध्या शिमलामध्ये आहे.
6 / 9
श्रुती मराठे हिने इंस्टाग्रामवर शिमलामधील फोटो शेअर केले आहे. या फोटोत तिने गुलाबी रंगाचे लोकरीचे टॉप घातला आहे. तिने या फोटोंसोबत शिमला, शूट, स्नो आणि प्रेम असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
7 / 9
श्रुती मराठेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. ते फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
8 / 9
श्रुतीला राधा ही बावरी या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मराठीसोबतच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. २०१६ साली आलेल्या बुधिया सिंग बॉर्न टू रन या चित्रपटात ती झळकली आहे.
9 / 9
श्रुतीने रमा माधव, तप्तपदी, पुणे-मुंबई-पुणे २ या गाजलेल्या चित्रपटांमध्येही झळकली आहे.
टॅग्स :श्रुती मराठे