Join us  

लग्नानंतर प्रथमेश-क्षितीजाने साजरा केला पहिला गुढीपाडवा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 10:43 AM

1 / 9
काहीच दिवसांपूर्वी प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत थाटामाटात लग्न केले. प्रथमेशच्या लग्नाची खूप चर्चा झाली. प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडीओ - फोटोंना चांगलीच पसंती मिळाली होती.
2 / 9
लग्नानंतर प्रथमेशचा पहिला गुढी पाडवा आहे. या निमित्ताने प्रथमेश आणि क्षितीजाने स्पेशल फोटोशूट केले आहे. फोटो शेअर करून प्रथमेशने चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
3 / 9
प्रथमेश परबने गुढीपाडव्या निमित्त फोटोशूट केले आहे. यात त्याने व्हाइट कुर्ता आणि त्यावर पैठणीचं जॅकेट घातले आहे.
4 / 9
तर क्षितीजाने पिंक रंगाचा कुर्ता घातला आहे. या फोटोशूटमध्ये ते दोघे खूप छान दिसत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
5 / 9
त्याने हे फोटो शेअर करत लिहिले की, संस्कृतीच्या क्षितिजावर, पहाट नवी उजळून आली... आयुष्यात पुन्हा नव्याने, क्षण सोन्याचे घेऊन आली..!!! #पहिला गुढीपाडवा.
6 / 9
प्रथमेश परबच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहेत. चाहते त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7 / 9
प्रथमेश - क्षितीजा यांनी २४ फेब्रुवारीला एकमेकांशी लग्न केले.
8 / 9
या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
9 / 9
प्रथमेश - क्षितीजा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
टॅग्स :प्रथमेश परब